आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत:विस्तारित भागाचा पाणीप्रश्न सुटणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका हद्दीबाहेरील अयोध्या नगर, स्वरुप कॉलनी परिसरातील सुमारे अडीच हजार लोकवस्तीचा पाणीप्रश्न साकेगाव ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशनमधून सुटेल, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. जलजीवन मशिन अंतर्गत पालिका हद्दीबाहेरील भागांना पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अयोध्या नगर, स्वरुप कॉलनी, महालक्ष्मी नगर, वरद विनायक कॉलनी, नारायण फेज १ ते ३, स्वामीविहार, मोरेश्वर नगर, ठोके नगर, भाग्यश्री विहार, गोदावरी नगर या पालिका हद्दीबाहेरील भागात पालिका सेवासुविधा देत नाही. प्रसंगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.

कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून साकेगाव ग्रामपंचायतीच्या साडेसात कोटींच्या पाणीपुरवठा योजनेत या भागाचा समावेश केला आहे. या योजनेतून सोमवारी महालक्ष्मी नगरात १ लाख १५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्याच्या कामाचे आमदार सावकारे यांनी भूमिपूजन केले. सहा महिन्यात त्याचे काम पूर्ण होईल. तसेच पुन्हा १ लाख १५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, महेंद्रसिंग ठाकूर, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, भाजपचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, अजय नागराणी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...