आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णा पात्र:महिलेची हत्या, मृतदेह गाठोडे बांधून सुकळीतील पूर्णा पात्राजवळ फेकला

मुक्ताईनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​सुकळी शिवारातील पूर्णा नदीपात्राजवळ सोमवारी सकाळी पिशवीत बांधून फेकलेला महिलेचा मृतदेह आढळला. हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. सोमवारी सकाळी मुक्ताईनगर शिवारातील वन विभाग कंपार्टमेंटच्या डोलारखेडा रोडवरील पुलाखाली सुकलेल्या पात्रात बेशरमीच्या झाडाझुडपात महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह निळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदात गुंडाळून नायलॉनच्या गोणीत गाठोडे बांधल्यासारखा भरला होता.

या गोणीवर रामजी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, अकोला असे नाव आहे. दरम्यान, हा प्रकार उघड होताच परिसरात खळबळ उडाली. ही माहिती मिळताच डीवायएसपी कुणाल सोनवणे, बोदवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गुंजाळ, फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने त्यांनी तो मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. हा मृतेदह येथे कोणी आणून टाकला? यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. सायंकाळी मुक्ताईनगर पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत. महिलेची ओळख पटलेली नसून विविध भागात तपास सुरू आहे असे डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी सांगितले.

डोक्याला जबर मार, तीन दिवसांपूर्वी मृत्यू
सायंकाळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. यानंतर वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षांपर्यंत आहे. डोक्याला जबर मार लागल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झालेला असावा. तसेच मृतदेह पुलावरून खाली फेकल्याने पायाची हाडे मोडल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...