आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापांडुरंग टॉकीज जवळ वाहतूक शाखेतील महिला पोलिसाने एका मालवाहू वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने दुर्लक्ष करून घाईगडबडीत गाडी वेगाने जामनेर रोडकडे पळवली. त्यामुळे शंका येताच पोलिस कर्मचारी विजया सपकाळे यांनी ३ किमी पाठलाग करून गाडी पकडली. त्यातून ७ गुरांची वाहतूक सुरू होती.महिला पोलिस विजया सपकाळे रविवारी सकाळी ११ वाजता पांडुरंग टॉकीजजवळ कर्तव्यावर होत्या. यावेळी जामनेरकडे जाणाऱ्या पिकअपला थांबण्याचा इशारा केला. पण, चालकाने गाडी दमटली. यामुळे सपकाळेंनी दुचाकीने गाडीचा पाठलाग सुरू केला.
हॉटेल शेरे पंजाबजवळ पिकअपचा वेग कमी होताच सपकाळेंनी हिंमतीने स्वत:ची दुचाकी रस्त्यावर आडवी लावली. यानंतर थांबलेल्या मॅटेडोअर चालक, क्लीनरकडे कागदपत्रे मागताच त्यांची पलायन केले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या काही लोकांनी दोघांचा पाठलाग केला. पण, उपयोग झाला नाही. दरम्यान, वाहतूक शाखेचे अधिकारी स्वप्निल नाईक तेथे आले. त्यांनी विना क्रमांकाच्या वाहनात पुढील बाजूला ७ गुरे (गोऱ्हे) भरली होती. तर मागील बाजूला कुट्टीचे पोते ठेवले होते. हे वाहन डीवायएसपी कार्यालयात जमा करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.