आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धावत्या मालगाडीतून कोळशाची चोरी; 3 संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगर प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवणाऱ्या धावत्या वॅगन मधून कोळसा चोरी केल्याप्रकरणी फुलगाव येथील करण कैलास कुऱ्हाडे याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल वाघोदे यांनी फिर्याद दिली.

त्यात करण कुऱ्हाडे व अन्य दोन संशयित १४ रोजी रात्री ८.१५ वाजता पिंप्रीसेकम गेटजवळील धावत्या वॅगनमधून २० हजार रुपये किमतीचा ५ टन कोळसा चोरी करताना आढळले. या प्रकरणी तालुका पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहायक फाैजदार श्यामकुमार मोरे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...