आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरपीआयचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे तात्कालिन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात, सोनू उर्फ रोहीत रवींद्र खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, सुनील बाबूराव खरात व सुमित संजय गजरे यांच्या हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज सोमवारी भुसावळ विशेष सत्र न्यायालयाने फेटाळला. भुसावळ शहरात ६ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचे सामूहिक हत्याकांड झाले होते. पिस्तुलमधून गोळ्या झाडून व चॉपरने वार करुन त्यांची हत्या झाली होती. संपूर्ण राज्यात हे सामूहिक हत्याकांड गाजले होते.
या गुन्ह्यातील आरोपी गोलू उर्फ अरबाज खान अजगर खान याने भुसावळ येथील विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी होऊन सोमवारी (दि.१३) भुसावळ विशेष सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संजय सोनवणे तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सत्यनारायण पाल यांनी युक्तीवाद केला. या सुनावणीकडे शहराचे लक्ष लागून होते. त्यामुळे बंदोबस्तही वाढवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.