आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे नाराज आमदार मुंबईतून सुरत व तेथून थेट गुवाहाटीत दाखल झाले. अनेकांकडे तर वापरासाठी कपडे देखील नव्हते. मात्र, गुवाहाटीच्या हॉटेलात टूथ ब्रशपासून कपड्यांपर्यंत सर्व व्यवस्था केली आहे. बाहेर जाण्यास मात्र कोणालाही परवानगी नाही. प्रत्येक आमदार व सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना हॉटेलात स्वतंत्र रुम दिल्या आहेत. कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, अशी माहिती गुवाहाटीतील ‘हॉटेल रेडिसन ब्लू’मध्ये आमदारांसोबत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केले. सोमवारी (दि.२१) विधान परिषदेचे निकाल सुरु असतानाच शिंदे समर्थक आमदारांच्या गटाने सुरत गाठले. या गटासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू हे एक आमदार व समर्थकांसह आहेत. यात बच्चू कडू यांचे समर्थक तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी देखील आहेत.
‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधून तेथील परिस्थिती जाणून घेतली. ते म्हणाले की, गुवाहाटी एअर पोर्ट पासून आठ ते नऊ किमी अंतरावर असलेल्या हॉटेल रेडिसन ब्लू आहे. तेथे आमदारांची व्यवस्था केली आहे. मंगळवारी सकाळी आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा ३३ ते ३५ आमदार होते. बुधवारी ते ४० पेक्षा अधिक होते. गुरुवारी ही संख्या आणखी वाढेल, अशी चर्चा येथे आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.