आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगमर्यादा:महामार्गावर वेगमर्यादेचा सूचना फलकच नाही, तरीही वाहन चालकांवर कारवाई का? ; मनमानी थांबवा

मुक्ताईनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावर वेग मर्यादेबाबत सूचना देणारे कोणतेही फलक लावलेले नाही. तरीही वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी बोहर्डा-बोहर्डी गावाजवळ महामार्ग पोलिस पथक कारवाई करत होते. या भागातून जाताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पथकाजवळ थांबून ही मनमानी थांबवा. जर किती वेगाने वाहन चालवावे, याबाबत माहिती देणारे फलक नाही तर कारवाई कशाच्या आधारे करत आहात? असा जाब विचारला. २१ मे रोजी आमदार चंद्रकांत पाटील हे मतदार संघात फिरत होते. त्यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुक्ताईनगर ते जळगाव दरम्यानच्या रस्त्यावर बोहर्डा-बोहर्डी गावाजवळ वाहतूक पोलिस नियंत्रकांची गाडी थांबली होती. या वाहनातील स्पीड गनद्वारे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची नोंद सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे आमदारांनी स्वत:चे वाहन थांबवून पथकाला सुरू असलेल्या कारवाईबाबत जाब विचारला. मूळातच महामार्गावर वाहनांना वेग मर्यादेची माहिती देणारे सूचना फलक कुठेही लावलेले नाही. त्यामुळे वाहन चालक नियमांबाबत अनभिज्ञ असतात. त्यांना थेट ऑनलाइन दंडाचा मेमो पाठवला जातो. हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी चर्चा केली. चुकीची कारवाई नको, असा आग्रह धरला.

बातम्या आणखी आहेत...