आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओढ शाळेची:एसटी नव्हती, सायकलीने गाठली विद्यार्थ्यांनी शाळा

मुक्ताईनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कर्की येथील राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी पाचवी ते दहावीच्या व नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन शाळेतर्फे स्वागत करण्यात आले.

दोन वर्षे शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके, गणवेश मिळणार असल्याने आनंदाने उजळले होते. मात्र, मानव सेवेच्या शाळेच्या बससे सुरू न झाल्याने खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. तर काहींनी स्वतःच्या वाहनाने पालकांसोबत अथवा सायकलीने शाळा गाठली. परिसरातील बेलसवाडी, कर्की, लोहारखेडा, धाबे पिंपरी, पिंपरी पंचम, रामगड या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी शाळेत मोठ्या संख्येने हजेरी लावली. शाळेच्या माध्यमातून परिसरातील पालक वर्गाला बोलावणे केले होते. मुख्याध्यापक बी.एस.वानखेडे, पर्यवेक्षक बी.डी.बारी व शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांचे देखील स्वागत केले. यानंतर शालेय पुस्तकांचे वाटप झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वर्गांची ओळख करून देण्यात आली. नंतर मागील अभ्यासाची उजळणी करून घेतली. मध्यान्ह सुटीत विद्यार्थ्यांनी मित्रांसोबत शालेय पोषण आहाराचा झाडाखाली बसून आस्वाद घेतला.

बातम्या आणखी आहेत...