आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विमिंग पूल:बास्केटबॉल, हँडबॉल, टेनिस, खो-खो मैदान नेट क्रिकेटसह आधुनिक स्विमिंग पूल होणार

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठी ७ कोटी ८९ लाख ९४ हजार रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळालेली असल्याने निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. त्यात बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलिबॉल, टेनिस, लांब उडी, ट्रिपल जम्प, रनिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, कबड्डी, खो-खो, नेट क्रिकेट आदी खेळांची स्वतंत्र मैदाने तयार होणार आहे. यामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धा, खेळाडूंना सरावासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होईल.

यापूर्वी जुगादेवी परिसरात १ कोटी निधीतून भुसावळ तालुका क्रीडा संकुलाची उभारणी झाली होती. मात्र, तेथे केवळ बॅडमिंटन हॉल, जॉगिंग ट्रॅक, खो-खो मैदान व सुरक्षा रक्षक केबिन तयार केली होती. पण, संरक्षण भिंत, सुरक्षा रक्षक नसल्याने अल्पावधीतच या संकुलाची वाताहत झाली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून क्रीडा संकुल भग्नावस्थेत आहे. मात्र, ही स्थिती बदलून विविध खेळांची मैदाने, खेळाडूंना सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हक्काचे ठिकाण उपलब्ध असावे अशी मागणी होती. त्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्यावर शासनाच्या क्रीडा विभागाने ७ कोटी ८९ लाख ९४ हजार रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली होती. तांत्रिक मंजुरी मात्र रखडली होती. ही मंजुरी मिळाल्याने निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होईल.

क्रीडा स्पर्धांसाठी मोठी सुविधा
भुसावळ शहरात एकही अद्ययावत क्रीडा संकुल नाही. काही शाळा सोडल्या तर क्रीडा प्रकारांचे सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. आगामी काळात क्रीडा संकुल उभारणी नंतर आंतरशालेय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या मैदानावर होऊ शकतील.

वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर यश
तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाल्यावर क्रीडाप्रेमींसाठी मोठी उपलब्धी ठरेल. उदयोन्मुख खेळाडूंना सरावासाठी हक्काचे मैदान उपलब्ध होईल. जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येईल. संजय सावकारे, आमदार, भुसावळ

उत्तरेकडील भागात स्विमिंग पूल
संकुलाच्या उत्तरेकडील भागात २१ बाय २५ मीटर लांबीचा स्विमिंग पूल, जवळच चेजिंग रुम असेल. प्रशासकीय कार्यालय व इतर सुविधा असतील. तालुका क्रीडा संकुलाला पाणीपुरवठा करण्यासाठी नेट क्रिकेट मैदानाजवळ कूपनलिका करण्याचे नियोजन आहे.

५०० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक
क्रीडा संकुलाच्या कामांमध्ये विविध स्पोर्ट कोर्टच्या (मैदान) चारही बाजूंनी ५०० मीटर लांब व ३.५ मीटर रुंदीचा जॉगिंग ट्रॅक, तर अंतर्गत भागात रनिंग ट्रॅक तयार होईल. क्रीडा संकुलाच्या संरक्षण भिंतीना लागून वृक्षारोपण केले जाणार आहे.
दिव्य मराठी
८ कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी, पावसाळ्यानंतर कामाला सुरुवातक्रीडा संकुल कात टाकणार
मंगळवारी आढावा बैठक होणार तांत्रिक मंजुरीनंतर क्रीडा संकुलाच्या कामासाठी तालुकास्तरीय क्रीडा समितीची आढावा बैठक मंगळवारी (दि.७) सकाळी ११ वाजता विश्रामगृहात होणार आहे. तालुका क्रीडा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आमदार सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. त्यात संकुलातील नियोजित कामांवर चर्चा होईल.क्रीडा

संकुलाचा नकाशा. सध्या संकुलाच्या मैदानाची अशी दुरवस्था झाली आहे.ॉ

बातम्या आणखी आहेत...