आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:भुसावळातील पथविक्रेते, फेरीवाल्यांचे होणार सर्वेक्षण

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ पालिका हद्दीतील फेरीवाले, पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. शासनाने विकसित केलेल्या मोबाइल अॅप द्वारे हे सर्वेक्षण होईल. दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हे नियोजन आहे.

यासाठी सर्वेक्षक नेमण्यात येतील. हे सर्वेक्षक शहरातील फेरीवाले व पथ विक्रेत्यांकडे जावून सर्वेक्षण करतील. यासाठी विक्रेत्यांना आपल्या नावाचे आधार कार्ड सादर करावे लागेल. मात्र, या आधारकार्डला मोबाइल क्रमांक लिंक असणे अनिवार्य असेल. या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. हा ओटीपी सर्वेक्षकाला सांगून त्यानंतर फेरीवाल्यांचे आधार क्रमांक व माहिती मोबाईल अॅपवर फोटोसह अपलोड होईल.

व्यावसायिकाकडे या कागदपत्रांची आवश्यकता आधारकार्ड, महाराष्ट्राचा अधिवास असल्याचा सक्षम प्राधिकरणाकडील दाखला (डोमिसाइल), शिधापत्रिका, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, आरक्षण प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला ही कागदपत्रे नोंदणीसाठी लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...