आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शौचालयाच्या कामांची चौकशी‎ होणार, यावलला उपोषण मागे‎

यावल‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीसमोर सुरू‎ असलेले निळे निशान सामाजिक‎ संघटनेचे जिल्हा उपाध्यक्षांचे उपोषण,‎ तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.‎ तालुक्यातील विविध गावात झालेल्या‎ विकासकामांची चौकशीची मागणी त्यांनी‎ केली होती. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत‎ तक्रारींची चौकशी करण्याचे आश्वासन‎ मिळाल्याने उपोषणाची सांगता करण्यात‎ आली.‎ यावल येथील पंचायत समिती समोर निळे‎ निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा‎ उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी उपोषण सुरु‎ केले होते. यावल तालुक्यातील म्हैसवाडी,‎ आडगाव, चिंचोली, कासारखेडा,‎ गिरडगाव, निमगाव, सावखेडासीम,‎ थोरगव्हाण, वड्री, परसाडे व डोंगरकोठरा‎ या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत‎ उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या‎ कामाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी‎ त्यांनी उपोषण सुरू केले होते.

दिनांक ३०‎ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले‎ उपोषण दिनांक १ फेब्रुवारी रोजी मागे‎ घेण्यात आले. उपोषणकर्ते अशोक तायडे‎ यांच्याशी सहायक गटविकास अधिकारी‎ किशोर सपकाळे, निळे निशान संघटनेचे‎ विलास तायडे, ग्रामसेवक संघटनेचे‎ तालुकाध्यक्ष रूबाब तडवी, बांधकाम‎ अभियंता प्रविण भारंबे, आबा पाटील,‎ मिलिंद कुरकुरे, हितू महाजन, किरण‎ सपकाळ, सुनील तायडे आदींनी‎ त्यांच्याशी चर्चा केली. पंचायत‎ समितीकडून त्यांनी केलेल्या तक्रारीची १०‎ फेब्रुवारीपर्यंत चौकशी केली जाईल, असे‎ आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे‎ घेण्यात आले.‎ यावल तालुक्यात ग्रामीण भागात‎ झालेल्या शौचालयांच्या कामांमध्ये‎ गुणवत्तेच्या अनेक तक्रारी आहेत.‎ त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत‎ असल्याची तक्रार होती. त्यामुळे‎ चौकशीच्या मागणीसाठी निळे निशाण‎ सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष‎ तायडे यांनी उपोषण सुरु केले होते.‎ आता, प्रशासनाने चौकशीचे आश्वासन‎ दिल्याने उपोषण मागे घेतले.‎‎

बातम्या आणखी आहेत...