आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:तुकारामनगरात चोरट्यांनी बंद घर फोडले

भुसावळ8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुकाराम नगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी ३६ हजार रुपयांची रोकड, पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, तीन तोळ्याचे कानातील व अन्य दागिने असा एकूण ६४ हजारांचा ऐवज लांबवला. सोमवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली.

शहरातील तुकाराम नगरातील रहिवासी तक्रारदार विरेंद्र मुरारी चौधरी (वय ३८) हे एलआयसीमध्ये नोकरीला आहेत. त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने ते रविवारी डोंबिवली येथे गेले होते. त्यामुळे घर बंद होते. रविवारी दुपारी १ ते सोमवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून रोख रक्कम व दागिने मिळून ६४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.