आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात गेल्या आठवड्यापूर्वी अप्सरा चौकात पाेलिस-व्यापाऱ्यांमध्ये वाद झाले होते. यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, बैठक घेऊन हा तोडगा काढण्याचा शब्द डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिला होता. त्यानुसार डीवायएसपी कार्यालयात पालिका, व्यापारी व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात हाॅकर्ससाठी स्वतंत्र जागा देण्यासाठी नेहरू मैदान आणि अन्य जागांवर चर्चा झाली.
अप्सरा चाैकात फेरीवाले हातगाड्या लावतात. त्यामुळे अनेकवेळा गाळेधारक व्यापारी व हाॅकर्समध्ये वाद होतात. गेल्या रविवारी पोलिसांनी हातगाड्या रस्त्यावरून मागे सरकवल्या. व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोरील अतिक्रमित साहित्य काढले. यामुळे व्यापाऱ्यांनी तीन तास बाजारपेठ बंद केली होती. यावेळी डीवायएसपी वाघचौरे यांनी व्यापाऱ्यांची चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे सांगितले होते. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व डीवायएसपी वाघचौरे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली.
डीवायएसपी कार्यालयातील बैठकीला व्यापारी संघाचे अशाेक नागरानी, विजय माेहन्नानी, तिलाेक मनवानी, जयपाल नागदेव, निक्की बतरा, जाॅनी मेघानी, पहलाजी आमलानी उपस्थित हाेते. त्यात नेहरू मैदान किंवा अन्य ठिकाणी हॉकर्सला स्वतंत्र जागा देता येईल का? यावर प्राथमिक चर्चा झाली. तसेच पालिकेने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यास बंदोबस्त देऊ असे डीवायएसपींनी सांगितले. मुख्याधिकारी चिद्रवार यांनी व्यापारी व हॉकर्समधील तिढा सोडवू असे सांगितले.
माहिती काढणे सुरू
पालिका प्रशासनाच्या माध्यमातून रस्ते माेकळे केले जातील. हाकर्सला सुध्दा जागा दिली जाणार आहे. शहरात किती हाॅकर्स आहेत? याची माहिती संकलित करणे सुरू आहे. त्यानंतर पालिकेकडून योग्य ती कारवाई होईल. साेमनाथ वााघचाैरे, डीवायएसपी
हाॅकर्सची घेणार बैठक
शहरातील हाॅकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दाेन दिवसात पालिका कार्यालयात बैठक होणार आहे. त्यात हाॅकर्सची बाजू समजून घेण्यात येईल. स्वतंत्र जागा देण्याबाबत विविध ठिकाणचे पर्याय जाणून घेतले जातील. नंतरच निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.