आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकांची नियुक्ती:थर्टी फर्स्टला माेठे हाॅटेल; पार्टी लाॅन्स राज्य उत्पादन शुल्कच्या निशाण्यावर

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर माेठे हाॅटेल्स, पार्टी लाॅन्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर राहतील. त्यासाठी २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पाच पथके कार्यरत राहतील. भुसावळ सोबतच संपूर्ण विभागात ही कारवाई होईल अशी माहिती विभागाचे अधीक्षक जितेंद्र गाेगावले यांनी दिली.थर्टी फर्स्टला गावठी हातभट्टीची दारू, बनावट दारूची विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाच पथकांची नियुक्ती केली आहे.

या पथकांकडून माेठे हाॅटेल्स, पार्टी लाॅन्सवर विशेष लक्ष ठेवण्यात येईल. शहर व महामार्गावरील परमीट रूममध्ये अधिकारी अचानक तपासणी करतील. कुणीही विना परवाना मद्यपान करताना आढळल्यास तपासणी करून गुन्हा दाखल होईल. तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वाहनांची तपासणी होईल. मुक्ताईनगर व बऱ्हाणपूरजवळील नाक्यावर २४ तास विशेष लक्ष असेल.

बातम्या आणखी आहेत...