आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:शिवपूर कन्हाळे‎ चौफुलीवर ही समस्या वाढली; महामार्गावरील सर्व्हिस‎ रोडला अतिक्रमणाचा‎ पडतोय वेढा‎

भुसावळ‎एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावरील सर्व्हिस रोडला अतिक्रमणाने‎ घेरले आहे. शहरातील शिवपूर कन्हाळे‎ चौफुलीवर ही समस्या वाढली आहे. यामुळे‎ अपघातांना आमंत्रण मिळण्याची भीती असली‎ तरी महामार्ग व स्थानिक प्रशासन देखील दुर्लक्ष‎ करत आहे.‎ शहरात राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव वाय‎ पॉइंट, नाहाटा चौफुली, कन्हाळे चौफुली,‎ खडका चौफुली, साकरी फाटा व वरणगाव वाय‎ पॉइंट आदी ठिकाणांवर असलेल्या‎ अंडरपासच्या परिसरात महामार्गावर जाण्यासाठी‎ सर्व्हिस रोड तयार झाले आहेत.

यामुळे‎ वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध झाल्या. मात्र,‎ सर्व्हिस रोड व अंडरपासच्या परिसराला‎ अतिक्रमणाने वेढले आहे. जळगाव वाय पाॅइंट‎ परिसरातील सर्व्हिस रोडवर हातगाडीवर टपऱ्या‎ थाटल्या गेल्या आहेत. यावर थांबणारे ग्राहक‎ सर्व्हिस रोडवरच वाहने पार्क करतात. यामुळे‎ अपघाताची भीती आहे. हिच स्थिती शिवपूर‎ कन्हाळे रोडवरील हॉटेल सुहास परिसरात आहे.‎ काही ठिकाणी पार्किंग झोन नसतानाही वाहने‎ थांबवली जातात. विशेषकरून अंडरपास व‎ सर्व्हिस रोडवर वाहने थांबवली जात असल्याने‎ अपघातांचा धोका वाढण्याची भीती आहे.‎