आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खगोलीय घटना:यंदा ६ ग्रहणांपैकी भारतामध्ये दिसतील दाेन‎ चंद्रग्रहण, एकही सूर्यग्रहण पाहता येणार नाही‎

जळगाव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२३ या वर्षात तीन‎ सूर्यग्रहण, एक चंद्रग्रहण व दाेन‎ माध्यचंद्रग्रहण असतील. मात्र,‎ भारतात केवळ एक‎ कंकणाकृती चंद्रग्रहण व एक‎ खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल .‎ त्यातही कंकणाकृती चंद्रग्रहण‎ एक उपछाया ग्रहण आहे.‎ यामुळे ग्रहणाच्या प्रभावाचे‎ नियम लागू होणार नाहीत असे‎ अभ्यासक सांगतात.‎ गेल्या ऑक्टोबर अश्विन‎ शुक्ल पक्ष पोर्णिमेच्या दिवशी‎ खंडग्रास चंद्रग्रहण होते. याचा‎ परिणाम भारतभर पडला होता.‎ ग्रहणावेळी काही नियम लागू‎ करण्यात आले होते. पंडित‎ रोहित पुजारी यांनी सांगितले‎ की, नव्या वर्षात सूर्याचा प्रभाव‎ अधिक असेल. वर्षाच्या‎ पहिल्याच दिवशी सूर्य रवी‎ तिथीमध्ये शनिदेव आपल्या‎ राशीत राहिले. ज्यात कोणताही‎ ग्रह घरात प्रवेश करू शकत‎ असल्यास सर्व राशींसाठी‎ अधिक परिणामकारक ठरते.‎

असे दिसणार चंद्रग्रहण‎ पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होईल. हे‎ देशात दिसू शकणार आहे. हे ग्रहण‎ छायाकल्प चंद्रग्रहण आहे. ते युरोप,‎ आशिया, अफ्रिका, इंडियन अोशन‎ येथून दिसेल. २८ ऑक्टोबर २०२३‎ रोजी होणारे ग्रहण हे खंडग्रास‎ चंद्रग्रहण आहे. ते युरोप, आशिया‎ ऑस्ट्रेलिया, उत्तर व दक्षिण‎ अमेरिका, पेसिफिक ओशन येथून‎ दिसेल. २०२३ या वर्षातील सूर्य आणि‎ चंद्र ग्रहणांपैकी फक्त चंद्रग्रहणाचे‎ दर्शन होवू शकणार आहे.‎

वैज्ञानिक दृष्टिकाेन ठेवा‎ यंदाच्या वर्षात सहा ग्रहण आहेत.‎ त्यात केवळ दोन चंद्रग्रहण‎ दिसतील. मात्र, एकही सूर्यग्रहण‎ दिसणार नाही. सूर्यग्रहण आणि‎ चंद्रग्रहण या खगोलीय घटना‎ ज्ञानवर्धक आणि महत्वाच्या‎ असतात. कोणताही‎ समज-गैरसमज मनात न ठेवता‎ वैज्ञानिक दृष्टीकोनातून याकडे‎ बघावे व आनंद घ्यावा.‎ अमोघ जोशी, खगोल अभ्यासक,‎ जळगाव‎

बातम्या आणखी आहेत...