आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपीचे सावट:यंदा सर्जा-राजाचा साज महागला; लंपीचे सावट, उलाढाल तूर्त कमी

शाम पाटील | सावदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्याच्या अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो. शेतकरी दरवर्षी या सणाची प्रतीक्षा करतात. मात्र, यंदा पशुधनावर लंपी आजाराचे सावट आहे. तसेच सर्जा-राजाचा साजशृंगार बनवण्यासाठी लागणारे पांढरे, निळे, लाल सूत व लोकर महागल्याने पोळा सणासाठी बळीराजाला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

रंगीत गोंडे, बैलांच्या शिंगाना बांधायची आकर्षक माथोटी, रंगीत मखर, घुंगरू, पितळी महादेवाची पिंड, नंदी व इतर सजावटीचे साहित्य यंदा दुपटीने महाग झाले आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बैलांच्या साजश्रृंगाराला मागणी कमी होती. शासनाने यंदा सणांचे नियम शिथिल केल्यामुळे सर्वच सणवार उत्साहात साजरे होणार आहेत. त्यामुळे दरवर्षीपेक्षा तीनपटीने साजशृंगाराच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सावद्याचे कारागिर या कामात व्यस्त आहेत. परंतु, गुरांवर लंपी या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.

बऱ्हाणपूरहून येतो कच्चा माल सावदा येथील कारागिर सर्जा-राजाच्या साजशृंगाराचे साहित्य तयार करतात. त्यासाठी कच्चा माल जळगाव व बऱ्हाणपूर येथून आणला जातो. कोणत्याही यंत्राचा वापर न करता चार गोंडी माठोटी, तीन गोंडी माठोटी, काशाचे दोर, हस्ती दंताची माठोटी, महादेव पिंडीच्या मूर्तीची माठोटी असे साहित्य तयार केले जाते. याच वस्तूंना अधिक मागणी असल्याने कारागिरांनी यंदा तिप्पट माल तयार केला आहेत.

यंदा मंदीचे सावट, वाढती महागाई हेच कारण आमच्या तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय आम्ही करत आहोत. पूर्वी शेतकरी पोळ्याच्या दोन महिने आधी मागणी नोंदवत असत. परंतु आता कोणीही नोंदणी करत नाही. व्यवसायावर मंदीचे सावट आहे. यास महागाई हेच प्रमुख कारण आहे. - महेश पाटील, कारागिर, सावदा

बातम्या आणखी आहेत...