आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील येवती येथील एकता महिला बचत गटाने गेल्या तीन वर्षांपासून, विविध प्रकारचे पापड तयार करून विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या पापडांना अमेरिकेसह मुंबई, जळगाव, बोदवड, जामनेर, फत्तेपूर, भरूच, मलकापूर, भुसावळ अशा विविध ठिकाणांवरून मागणी होत आहे. या बचत गटाने गेल्या चार महिन्यात पापड विक्रीतून तीन लाखांचा व्यवसाय केला आहे मागणीनुसार पापडांचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत येवती येथील दहा महिलांनी एकत्र येत एकता महिला बचत गटाची स्थापना केली होती.
सुरुवातीला कमी प्रमाणात केलेला पापड व्यवसाय आता प्रगतीपथावर आला आहे. सुरुवातीला दिवसाला केवळ दोन ते तीन किलो पापडांनी सुरुवात करून, आता एका दिवसाला २० ते ३० किलो पापड तयार करण्याचे काम महिला करत आहेत. त्यासाठी त्यांनी पापडाचे पीठ तयार करण्यासाठी मशीन घेतले आहे. घरच्या घरी पापड व्यवसाय करून एका महिला बचत गटाच्या सदस्यांनी स्वयंरोजगार निर्माण केला आहे. पुताबाई माळी, सीताबाई वाघ, अलका माळी, निर्मला वाघ, पंजाबी पठाण, सैदाबी पठाण, जायदाबी पठाण परिश्रम घेत आहेत. इतर महिलांनीदेखील आदर्श घ्यावा. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी व्हावे, असे आवाहन बीडीओ हेमंतकुमार काथेपुरी व तालुका अभियान व्यवस्थापक संदीप मेश्राम यांनी केले आहे.
पापडांचे प्रकार असे
नागली, पालक, टोमॅटो, जीरा व मका अशा पाच प्रकारच्या चवींचे पापड बचत गटातर्फे तयार केले जातात. पालक, टोमॅटो, जीरा पापड प्रत्येकी १६० रुपये किलो आहेत. तर नागली पापड १८० रुपये किलो व मका पापड १७० रुपये किलो आहेत. चिकाच्या कुरड्या ३०० रुपये किलोने विक्री होतात. विविध आकर्षक रंग व रुचकर चव असल्यामुळे पापडांना मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.