आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांना आश्वासन:नवीन योजनेतून साकेगावच्या प्रत्येक घरापर्यंत देणार नळांद्वारे शुद्ध पाणी

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साकेगाव येथे ७ कोटी ३५ लाख रुपये निधीतून जलजीवन मिशनअंतर्गतची पाणीपुरवठा योजना गावासाठी वरदान ठरेल. साकेगावच्या विकासासाठी आगामी काळातही निधी कमी पडणार नाही. राज्यातही या योजनेत प्रत्येक घरापर्यंत नळाने शुद्ध पाणी पुरवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे आपण आधीदेखील प्रयत्न केले. आताही त्यात खंड पडणार नाही, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. साकेगाव येथे रविवारी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या योजनेत प्रत्येक घरापर्यंत नळाने शुद्ध पाणी पुरवण्याचा संकल्प आपण पूर्ण करू. भुसावळ आणि जळगाव शहरातील अमृत योजनांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही दोन्ही मंत्री मुंबईत वरिष्ठस्तरीय बैठक घेऊ. भाजप शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा दूध संघाचे प्रशासक अजय भोळे, पं.स.च्या माजी सभापती वंदना उन्हाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रमस्थळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राजकारण आडवे येणार नाही : मंत्री गिरीश महाजन
जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारण आडवे येणार नाही. आम्ही दोन्ही मंत्री असल्याने विकासासाठी उपयोग होईल, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली. साकेगाव ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक केली. जिल्ह्यात कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले.

अमृतला वाढीव निधी द्या : आमदार संजय सावकारे
आधीचे सरकार असताना आम्ही विरोधात होतो. मात्र, गुलाबराव पाटील यांनी विकासकामे मंजूर करताना भेदभाव केला नाही. यामुळे साकेगावसह इतर गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली. आता भुसावळ शहरातील अमृत योजनेला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार सावकारेंनी केली.

बातम्या आणखी आहेत...