आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:यावलमध्ये तंबाखूजन्य पदार्थ जप्त; खात्री केल्यावर कारवाईचा दणका

यावल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल पोलिसांनी शहरातील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत असलेल्या एका पानमसाला दुकानावर छापा टाकला. या कारवाईत लाखो रूपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक तथा आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांनी शहरातील विविध ठिकाणी गस्ती दरम्यान गोपनीय माहिती काढली. यानंतर सोमवारी सायंकाळी पथकासह अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गांलगत आठवडे बाजार भागातील नशिब पान मसाला व गोली सेंटर येथे छापा टाकला. या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. या कारवाईत स्वत: कांबळे यांच्यासह सहायक फौजदार अजीज शेख, नीलेश वाघ, भूषण चव्हाण, रोहिल गणेश यांचा समावेश होता. हा मुद्देमाल मोजण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला जाईल, असे ठाणे अमलदार सहायक फौजदार अजीज शेख यांनी सांगितले. तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...