आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुग्धशर्करा योग:आज अक्षय्य तृतीया, रमजान ईदने साधला दुग्धशर्करा योग; हा दुग्धशर्करा योग साधून दिवसभर बाजारपेठेला उत्साहाचे भरते आले

भुसावळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे अनुक्रमे हिंदू व मुस्लिम बांधवांचे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आहे. हा दुग्धशर्करा योग साधून दिवसभर बाजारपेठेला उत्साहाचे भरते आले.

यापूर्वीची सलग दोन वर्षे कोरोनामुळे अक्षय तृतीया आणि रमजान ईद साजरी करण्यावर निर्बंध होते. बाजारपेठा बंद असल्याने सर्वत्र मरगळ होती. यंदा सुदैवाने कोरोना नियंत्रणात असल्याने आणि दोन्ही सण एकाच दिवशी असल्याने आगळावेगळा योग साधला गेला.

त्यामुळे हिंदू बांधवांनी अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी केले. आंबे (दर १०० ते १५० रूपये किलो), मातीची घागर (७० रुपयापुढे पुढे), खरबूज, नवीन कपडे, मिठाई खरेदीकडे कल दिसला. तर रमजान ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी देखील नवीन कपडे, पादत्राणे, सुंगधी अत्तर, टोप्या, शिरखुर्म्यासाठी ड्रायफ्रूटची खरेदी केली. दरम्यान, अप्सरा चौक, सराफा बाजार, डिस्को टॉवर, जामनेर रोड, मॉडर्न रोड भागात पोलिसांनी दिवसभर गस्तीवर भर दिला.

बातम्या आणखी आहेत...