आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोन ठिकाणी टोल, तरी खड्ड्यांतून प्रवास; दीपनगर, साकेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम संथ

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव ते चिखली दरम्यान महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नशिराबादजवळ टोलनाका सुरु केला. दुसरीकडे फेकरी जवळही टोल नाका सुरुच आहे. मात्र, दीपनगर जवळ रेल्वेचा उड्डाणपूल, फेकरी नाक्यावरील रस्ता व भुसावळ-जळगाव दरम्यान साकेगावच्या पुढे रेल्वे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना दोन ठिकाणी टोल भरूनही सुविधा मिळत नाहीत. याकडे महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करते.

साकेगाव जवळील रेल्वे उड्डाणपूल, दीपनगर-फेकरी जवळील उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. ये काम काम अपूर्ण असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघात होऊन जीवित हानीच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे फेकरी उड्डाणपुलाजवळ एकेरी वाहतूक होते. एका बाजूला पावसामुळे मोठा खड्डा तयार झाला आहे. तेथे मध्यंतरी मुरूम टाकला गेला. मात्र, अवजड वाहनांमुळे खड्ड्याचा आकार वाढून वाहन उलटण्याची भीती आहे. दीपनगर जवळील बस स्थानकाजवळ दुहेरी मार्ग संपून एकेरी मार्ग सुरू आहे. येथेही दोन मोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय दुभाजकांमध्ये गवत वाढले आहे.

फेकरी टोलनाक्यावर खड्डे
शासनाकडून टोल नाके ज्या ठिकाणी आहे तेथे खड्डे असल्यास कारवाई केली जाते. टोल नाका परिसरातील ५०० मीटरचा रस्ता टोलनाका प्रशासनाला तयार करावा लागतो. मात्र, फेकरी टोल नाक्याजवळच रस्त्यावर खड्डे पडले आहे. याकडे टोलनाका व महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...