आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णकार समाजाचा निर्णय:टाॅवेल-टाेपी, आहेरात वस्तू नकाे, राेख रक्कम द्या ; विधवा प्रथेसही मूठमाती द्या

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंधमुक्ती कार्यक्रमास नातलग व समाज बांधवांनी टॉवेल-टोपी आणू नये, कपडे, भांड्यांचा आहेर देण्याची प्रथा बंद करून फक्त रोख रक्कम स्वरूपात आहेर द्यावा, पती निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे यासारख्या अनिष्ट प्रथा बंद कराव्यात, असे क्रांतिकारी ठराव सुवर्णकार समाजाच्या येथे आयाेजित बैठकीत करण्यात आले. नव अहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे व्यंकटेश बालाजी मंदिरात गुणगाैरव समारंभ पार पडला. यावेळी समाज बांधवाच्या उपस्थितीत हे ठराव मंजूर झाले.

उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सुवर्णरत्न’ने गाैरव
यावेळी दहावी ते अभियांत्रकीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात समाज बांधवांनी उल्लेखनीय व विशेष योगदान दिल्यामुळे समाजातर्फे ‘सुवर्णरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात प्रकाश विसपुते, सुनील सोनगिरे, सागर विसपुते, नगीन सोनार, शुभम दुसाने, खिलेश्वरी सोनार, सेवानिवृत्त सैनिक विनोद बाविस्कर यांचा समावेश आहे.

असे केले ठराव मंजूर
ठराव एक - गंधमुक्ती कार्यक्रमावेळी टॉवेल, टोपी आणू नये. फक्त मामाकडील एकाच व्यक्तीने टाॅवेल टोपी आणावी. ठराव दाेन - कपडे व भांड्यांचा आहेर देणारी प्रथा बंद करून रोख रक्कम स्वरूपात आहेर द्यावा. लग्नसमारंभ, वाढदिवस, शेंडी, जाऊळ, घरभरणी, सत्यनारायण पूजा, लग्नाचा वाढदिवस आदी कार्यक्रमांना कपडे, गिफ्ट ऐवजी फक्त पैसे ठेवून पाकीट द्यावे. लग्नपत्रिकेत वस्तू रुपी व कपड्याचा आहेर देऊ नये. ठराव तीन - विधवा प्रथा बंद करावी. शासनाच्या या संदर्भातील परिपत्रकानुसार या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...