आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्पकता:वाहतूक नियंत्रणावरचे उपकरण प्रदर्शनात पहिले; एणगाव येथे आयोजन, प्राथमिक गटात नीरज पाटील, माध्यमिक गटात मुखदेश जैन पहिला

बोदवड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवडचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन एणगाव येथील जी.डी. हायस्कूलमध्ये झाले. प्राथमिक गट ५० आणि माध्यमिक गटात ३२ अशी एकूण ८२ उपकरणे होती. त्यात अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण कसे करावे? या विषयावर चिखली येथील जि.प.शाळेचा विद्यार्थी नीरज पाटील याच्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला.

आमदार चंद्रकांत पाटील, बीडीओ हेमंत काथेपुरी, गटशिक्षणाधिकारी बी.एन.लहासे, सरपंच अन्नपूर्णा कोळी, मुख्याध्यापक डॉ.पुरुषोत्तम गड्डम, केंद्रप्रमुख संजय पाटील, प्रतिमा चौधरी आणि समन्वयक वनिता अग्रवाल उपस्थित हाेते. शिक्षकांच्या गटातून प्राथमिक स्तर : शमीनाबी शेख बशीर (गाणितीय उपकरण, उर्दू बॉईज स्कूल, बोदवड). माध्यमिक स्तर : अमितकुमार परखड, (गणितीय साधन, महाजन विद्यालय, जामठी) हे प्रथम आले.

उच्च प्राथमिक गट
प्रथम - नीरज किशोर पाटील, (वाहतूक नियंत्रण, जि.प.शाळा, चिखली), द्वितीय - अंतरा कृष्णा पाटील (पावसाचे साचलेले पाणी, राष्ट्रीय विद्यालय, बोदवड), तृतीय हर्ष मनोज अग्रवाल (इलेक्ट्रॉनिक सेव्हिंग मशीन, रोझ पेटल्स इंग्लिश स्कूल, बोदवड) आणि विजयसिंह रमेश पाटील, (भूकंप मापन मशीन, जी.जे.राजपूत इंटरनॅशनल स्कूल, वरखेड). या सर्व गटातील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगांची उपस्थिती पाहणी केली.

माध्यमिक गट
प्रथम - मुखदेश जितेंद्र जैन, (मल्टी लेअर फार्मिंग, राका हायस्कूल, बोदवड), द्वितीय - जयेश उल्हास खडसे (मृदा व जलसंधारण, नूतन माध्यमिक शाळा, हरणखेड), तृतीय भागवत रमेश भिवटे, (वार्म हाऊस, जी.डी. हायस्कूल, एणगाव) आणि मृणाल जितेंद्र जैन (रेन वाॅटर हार्वेस्टिंग, राका विद्यालय, बोदवड) हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. सर्व विजेत्यांच्या कल्पकतेचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...