आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडथळा:झाड पडल्याने यावल-चोपडा रस्त्यावर वाहतूक झाली ठप्प; गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस

यावलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात चोपडा रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. पावसातच यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले. नंतर वाहतूक सुरळीत झाली. गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात चांगला पाऊस झालेला नव्हता. यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे होत्या. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

हा पाऊस यावल शहरासह दहिगाव, सावखेडासीम, नावरे, साकळी या भागात कोसळला. तर वादळी वाऱ्यामुळे चोपडा रस्त्यावरील नावरे फाट्याजवळ भले मोठे झाड कोसळले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यामुळे दिलासा मिळाला.