आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळे, अपघाताची भीती

भुसावळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जामनेर रोडला पडणारा अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढता आहे. त्यात दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाला व फळ विक्रेते थेट रस्त्यावर दुकाने लावतात. यामुळे वाहतुकीच्या रस्त्यावर अडचणी येतात. हा प्रकार एखाद्या गंभीर अपघाताचे कारण ठरू शकतो.

रविवार शहरात आठवडे बाजार असताे. यामुळे नागरिकांची गर्दी होते. त्यातच जामनेर रोडवर दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असते. पांडुरंग टॉकीज ते नाहाटा चाैफुलीपर्यंतचा रस्ता गजबजलेला असताे. रस्त्यावर दुकाने, हातगाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांमुळे या गर्दीत भर पडले. काही विक्रेते थेट रस्त्यावर दुकाने थाटतात. प्रामुख्याने फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हे प्रकार होतात. परिणामी जामनेर रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होते. पालिका व वाहतूक शाखेकडून कारवाईत सातत्य नसल्याने विक्रेते मनमानी करतात. हे दुर्लक्ष जामनेर रोडवर विशेषत: बाजार भरतो त्या ठिकाणी गंभीर अपघाताचे कारण ठरू शकते.

बातम्या आणखी आहेत...