आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक उपक्रम‎:माता-पालक गट सभेत‎ पालकांना दिले प्रशिक्षण‎

कुऱ्हे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानाचे‎ येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत‎ शुक्रवार दि १८ रोजी माता पालक गट सभा ‎घेण्यात आली. या सभेत फातेमा शेख व ‎ ‎ झांसी की रानी असे दोन्ही गटांचे प्रमुख व ‎माता यांच्या उपस्थितीत पालक मातांना ‎प्रशिक्षण देण्यात आले.‎ विद्यार्थ्यांनी फक्त शाळेतच शिक्षण‎ घेऊ नये तर त्यांनी घरीसुद्धा कृतीयुक्त‎ पद्धतीने शिक्षण घ्यावे. त्यासाठी माता‎ पालकांना शाळेतील शिक्षकांनी‎ लहान-मोठी संख्या, उजवी बाजू -डावी‎ बाजू, मधली वस्तू यामध्ये कैची, चावी,‎ पेन, चमचा, चॉकलेट वा घरात उपलब्ध‎ असलेले साहित्य घेऊन मुलांकडून‎ कृतीयुक्त अभ्यास करून घ्यावा.

ज्या‎ वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या‎ सुरुवातीला दाखवून त्यावर रुमाल टाकून‎ कोणती वस्तू कशाप्रकारे लावलेली आहे?‎ कोणत्या वस्तू अगोदर? नंतर कोणती‎ वस्तू आहे? हे दाखवले. अभ्यास केला‎ तर लक्षात राहते असे सांगितले. केंद्र प्रमुख‎ अशिक शेख यांनी मार्गदर्शन केले.‎ मुख्याध्यापिक रुबिना परवीन, रिजवान‎ खान यांनी कृती करून दाखवली.‎

बातम्या आणखी आहेत...