आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासपूर्ण प्रशिक्षण:बोदवड येथे ग्रामरोजगार‎ सेवकांना दिले प्रशिक्षण‎ ; क्षेत्रभेट उपक्रमाला मोठा प्रतिसाद‎

बोदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती अंतगर्त समृद्ध‎ बजेट प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे, सुरवाडा‎ बुद्रूक येथे क्षेत्रभेट उपक्रम राबवला गेला.‎ यात ग्रामरोजगार सेवकांना समृद्ध‎ बजेटअंतर्गत कोणत्या बाबी घ्यायच्या,‎ यासह गावाचा विकास करण्यात सहभाग‎ कसा घ्यावा, लेबर बजेट कसे बनवावे,‎ याचे अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले.‎ सुरवाडा बुद्रुक ग्रामपंचायतीद्वारे‎ प्रशिक्षणा दरम्यान आराखड्याबाबत‎ सहकार्य करण्यात आले. सरपंच श्रीकांत‎ कोळी, उपसरपंच मनोहर सुरवाडे, माजी‎ सरपंच पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य‎ व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.‎ गावकऱ्यांनी मनरेगाच्या या कार्यक्रमात‎ सहभाग घेतला. शिवार फेरी, माथा ते‎ पायथा सर्वेक्षण या बाबींचा समावेश होता.‎ बोदवड पंचायत समिती सभागृह येथे‎ प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला.‎ प्रशिक्षक इम्रान तडवी, किशोर पाटील,‎ समाधान पवार यांनी प्रशिक्षण दिले. तर‎ गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी‎ यांनी योजना राबवताना कोणती काळजी‎ घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. बोदवड‎ पंचायत समिती मनरेगा सहायक कार्यक्रम‎ अधिकारी दिनेश अंजाळे यांनी, सर्वांच्या‎ सहकार्यातूनच कार्यक्रम शक्य होऊ‎ शकतो असे प्रतिपादन केले. बी.एम.पवार,‎ अजय पाटील उपस्थित होते तालुक्यातील‎ ग्रामरोजगार सेवक सोपान धीवर, अमोल‎ सूर्यवंशी, भगवान पाटील, सागर गोसावी,‎ युवराज सुरवाडे, अमोल तायडे, राजेंद्र‎ सोनवणे, योगेश पाटील व सर्व रोजगार‎ सेवकांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...