आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विभाग:निर्यातक्षम केळी उत्पादनाचे प्रशिक्षण

मुक्ताईनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामखेडा (ता.मुक्ताईनगर) येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादन, सीएमव्ही, जिवाणू व विषाणुजन्य आजारांना अटकाव कसा घालावा? जीआय मानांकन, पीएम किसानची ई-केवायसी आदींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

खामखेडा जवळ अशोक बळीराम पाटील यांच्या शेतात या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. आमदार चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रशिक्षणात देसाई फ्रूट एक्सपोर्ट कंपनीच्या प्रतिनिधींनी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्र व निर्यातीचे निकष काय असतात हे शेतकऱ्यांना समजवून सांगितले. बड इंजेक्शन व स्कर्टिंग बॅग वापराचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.महेश महाजन यांनी सीएमव्ही व्हायरस, तर धीरज नेहेते यांनी केळी पिकावरील जिवाणू व विषाणुजन्य रोगांबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी शेतकऱ्यांना जीआय मानांकन, पीएम किसानसाठी ई-केवायसी का गरजेची आहे, ही माहिती दिली. तसेच कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. खामखेडाचे सरपंच पुंडलिक तायडे, उपसरपंच भागवत पाटील, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील, योगेश पाटील, भास्कर पाटील, छोटू पाटील, विनोद पाटील, महेंद्र मोंढाळे, नवनीत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...