आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १३ गावांतील लोकप्रतिनिधी, आशासेविका, सेवाभावी जल संरक्षक, बचत गटातील महिलांना दोन दिवस जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील जल व्यवस्थापन सक्षम होण्यास मदत होईल. यावल शहरातील मेहतर सामाजिक सभागृहात हा प्रशिक्षण वर्ग पार पडला. राज्याचे पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, मुंबई आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामस्तरीय भाग धारकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. जलजीवन मिशन मुख्य संसाधन संस्था राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन अमळनेरकडून मार्गदर्शन करण्यात आले.
पाडळसे, कोसगाव, वनोली, दुसखेडा कासवा, पिळोदा बुद्रुक, अंजाळा, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, भालोद, म्हैसवाडी, बामणोद, आमोदा या १३ गावातील ग्रामपंचायत स्तरातील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जलसंरक्षक, स्वच्छताग्रही, महिला बचत गट प्रतिनिधी या पैकी ५ लोकांना त्यात प्रवेश होता. प्रशिक्षणात तांत्रिक, सामाजिक व आर्थिक बाबींबद्दल माहिती देण्यात आली. प्रशिक्षक म्हणून विजय कोळी, सुभाष देठे, नीलेश पगारे, अक्षय भोई, अजय बढे, जगदीश डोळे यांनी काम पाहिले. प्रशिक्षणानंतर धनंजय चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप झाले.
गावाचे नकाशे तयार या प्रशिक्षणात सहभागींनी आपल्या गावाचे नकाशे तयार केले. तसेच आपल्या गावात ही योजना कशी कार्यान्वित येईल. ती यशस्वी कशी होईल? या संदर्भात नियोजन केले. तसेच जल जीवन मिशनमधून ज्या कुटुंबांना नळ जोडणी मिळेल. त्यांना दररोज नळाद्वारे ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.