आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलंब:उत्तर भारतातून येणाऱ्या‎ रेल्वेगाड्या लेटलतीफ‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतात पडणारी थंडी व धुक्यामुळे‎ भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या‎ उशिराने धावत आहेत. लेट लतिफ‎ गाड्यांमुळे प्रवाशांना तासनतास‎ स्थानकांवर ताटकळत बसावे लागत‎ अाहे. शनिवारी मुंबई मेल २.२० तास,‎ पवन एक्स्प्रेस २, दानापूर पुणे एक्स्प्रेस ३०‎ मिनिटे, हमसफर एक्स्प्रेस २.४०, ताप्ती‎ गंगा एक्स्प्रेस ३.३०, काशी एक्स्प्रेस ५.३०‎ तास नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावत‎ हाेत्या.

गेल्या महिन्यात उत्तर भारतातून‎ भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या‎ नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत हाेत्या.‎ त्यामुळे प्रवासाचा खोळंबा झाला होता. हे‎ वेळापत्रक पूर्वपदावर येण्यापूर्वीच आता‎ पुन्हा एकदा गाड्या उशिराने धावणे सुरू‎ झाले आहे. यामुळे भुसावळ विभागातील‎ प्रवासी वैतागले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...