आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:‘अमृत भारत’मधून सावद्यासह‎ रावेर स्थानकाचा कायापालट‎

भुसावळ‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत भारत योजनेंतर्गत विभागातील‎ ३५ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार‎ आहे. त्यात रावेर, सावद्याचा समावेश‎ असल्याची माहिती डीआरएम‎ एस.एस.केडिया, गती शक्ती युनिटचे‎ मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन‎ पाटील यांनी दिली.‎ या योजनेत निवड झालेल्या‎ स्थानकांवर दुचाकी व चारचाकी‎ वाहनांची पार्किंग व्यवस्था, मार्ग,‎ स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय,‎ आरामकक्ष, पादचारी पूल, लिफ्ट,‎ गार्डनची निर्मिती होणार आहे.

ही कामे‎ कुठे व कशा प्रकारे होतील याचे‎ नियोजन करण्यात आले.‎ निरीक्षणावेळी वरिष्ठ विभागीय‎ वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज‎ मानसपुरे, वरिष्ठ विभागीय विद्युत‎ अभियंता पालटासिंग, वरिष्ठ विभागीय‎ सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय‎ कांची, वरिष्ठ मंडळ अभियंता‎ (दक्षिण) निशांत कुमार व मंडळ‎ अभियंता शुक्ला उपस्थित होते. इतरही‎ स्थानकांवर नियोजन सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...