आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:वाहतूक शाखा जुन्या डीवायएसपी कार्यालयात; पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांच्याहस्ते उद्घाटन

भुसावळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायद्याचा वापर करून शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवावी, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलिस वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या डीवायएसपी कार्यालयाच्या इमारतीमध्ये शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्याहस्ते बुधवारी झाले.

पुढे बोलताना डॉ.मुंढे म्हणाले की, वाहतूक शाखेला कार्यालय उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे शाखेने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून जास्तीत जास्त चांगली सेवा द्यावी. शहर वाहतूक शाखेला स्वतंत्र कार्यालय नसल्याने हे कार्यालय देण्यात आले आहे. या इमारतीची दुरुस्ती करून शहर वाहतूक शाखेचे कार्यालय तयार करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कार्यालयाची फित कापून उद्घाटन करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. प्रास्तावीक डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी वाहतूकीची माहिती दिली. पोलिस निरीक्षक गजानन पडघान, निरीक्षक राहुल गायकवाड, निरीक्षक विलास शेंडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...