आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:सुरक्षित प्रवासी सेवेसाठी परिवहन महामंडळ बांधिल : जी.पी.जंजाळ ; परिवहन मंडळाचा 75 वा वर्धापन दिन साजरा

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षित प्रवासाचे एसटी हे एकमेव माध्यम आहे. हाच विश्वास पुढे कायम राहिल असे मत यावल आगाराचे व्यवस्थापक जी.पी.जंजाळ व्यक्त केले. आगारात परिवहन मंडळाचा अमृत महोत्सवी ७५ वा वर्धापन दिन साजरा करताना प्रवाशांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावल बसस्थानकात बुधवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक जी.पी.जंजाळ होते. त्यांनी प्रवाशांना अखंड सेवा देणाऱ्या व त्यातच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बस प्रवाशांच्या विश्वासाला पात्र असल्याचे सांगितले. पुढे देखील चांगली सेवा देण्यासाठी आगारातील प्रत्येक कर्मचारी बांधिल असल्याची ग्वाही दिली. यानंतर बसस्थानकावर जमलेल्या प्रवाशांचे स्वागत व सत्कार झाला. सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस.जे.अडकमोल, वाहतूक निरीक्षक एम.के.वानखेडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक डी.बी.महाजन, कमलाकर चौधरी, डी.जी.ठाकरे, आर.टी.कोळी, अर्जुन बारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाल्मीक सपकाळे, आभार मेहमूद तडवी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...