आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गाळाची वाहतूक केली; ‘महसूल’कडून धमकी; शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

रावेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणातून गाळ वाहतुकीला शासनाची परवानगी असताना रावेर तालुक्यात महसूल विभागाचे अधिकारी गाळ वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार कांडवेल येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धरणातून शेतकऱ्यांना विना मोबदला गाळ काढणे व त्याची वाहतूक करण्यास शासनाची ६ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार परवानगी आहे. सध्या कांडवेल परिसरातील शेतकरी तापी नदी पात्रातून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी त्याची वाहतूक करत आहेत. मात्र गाळ वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी अडवून दंडात्मक कारवाईची धमकी देत आहेत. तर आर्थिक तडजोड करण्यासाठी हेतुपुरस्सरपणे शेतकऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार छोटू पाटील, प्रदीप पाटील, शरद बगाडे, देवानंद कोळी, देवानंद तायडे, किशोर फालक, खुशाल फालक यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत तक्रारदार शेतकऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिली आहे. दरम्यान खरीपासाठी हा गाळ शेतांमध्ये टाकण्यात येत होता. परंतु आता हे काम थंडावले आहे.

उत्खनन, वाहतुकीसाठी रितसर परवानगी घ्या
ग्राम विकास व जल संधारण विभागाच्या निर्णयानुसार गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजना राबवण्यात येते. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी विनामूल्य गाळ वाहतूक करायची असेल त्यांनी ज्या बंधारा किंवा पाझर तलावातून गाळ वाहतूक करायची आहे त्यासाठी उत्खननाची तर वाहतुकीसाठी प्रांताधिकारी यांची रीतसर परवानगी घ्यावी. विना परवानगी गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
उषाराणी देवगुणे, तहसीलदार, रावेर.

बातम्या आणखी आहेत...