आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईत जप्त:जप्त केलेल्या वाहनांवर उगवली झाडे अन् वेली

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून, कारवाईत जप्त केलेली अनेक वाहने १५ बंगला भागातील एसटी डेपोच्या आवारात ठेवली आहे. या वाहनांवर आता वेली अन् झाडे उगवली आहेत. यात स्कूल बस, रिक्षा, कार, ट्रक, क्रेन आदी वाहनांचा समावेश आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाहने, डेपोच्या आवारात ठेवली जातात. या वाहनांबाबत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वाहने ताब्यात ठेवली जातात. संबंधितांना दंड ठोठावण्यात आल्यानंतर, दंड भरून ही वाहने संबंधितांना परत केली जातात. मात्र, अनेक वाहनांचे मालक दंड भरत नाहीत. काही वाहनांची न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असते.

बातम्या आणखी आहेत...