आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व माजी आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृति दिनानिमित्त भालोद येथील सखाराम ग्रामीण सहकारी पतसंस्था येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्व.हरिभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, डांभुर्णीचे अजित चौधरी, चेअरमन हेमलता इंगळे, हर्षल पाटील, पद्माकर महाजन, सुरेश धनके, डॉ.कुंदन फेगडे, चोपड्याचे शांताराम आबा पाटील, हिरालाल चौधरी, हर्षल पाटील यांनी हरिभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. न्हावी येथील के.जी. पाटील यांनी हरिभाऊंना आवडणारे ‘या जगण्यावर, या मरण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गीत सादर केले. या प्रसंगी गणेश नेहेते, शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, नारायण चौधरी, मुन्ना पाटील, नंदू महाजन, सविता भालेराव, कांचन फालक, उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी, लालचंद पाटील, अमोल जावळे, प्रदीप जावळे, प्रवीण परतणे, अरुण चौधरी, दिलीप चौधरी, नितीन चौधरी, किशोर नेहेते, संजय ढाके आदींसह गावागावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली व आठवणींना उजाळा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.