आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:भर पावसात निघाली तिरंगा सन्मान रॅली; ध्वजाराेहणासह विविध उपक्रम

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त मुख्य ध्वजाराेहणाचा कार्यक्रम प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या हस्ते पार पडला. यानंतर आमदार संजय सावकारे यांचे हस्ते तिरंगा सन्मान रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. यावेळी प्रांत सुलाने, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धिवरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी पावसाने सुद्धा हजेरी लावली. भर पावसात हजाराे नागारिक, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी ७५ बाय ३ मीटर लांबीचा तिरंगा झेंड्यासह प्रमुख मार्गावरून रॅली काढली. विविध कार्यालयांमध्ये ध्वजाराेहण करण्यात आले.

येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजाराेहण प्रांताधिकारी सुलाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, होमगार्डचे प्रभारी समादेशक अधिकारी व्ही.खरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, होमगार्ड अधिकारी सुरेश इंगळे, दारासिंग पाटील, विद्या लोखंडे, नंदकिशोर पंड्या, अर्जुना संस्था पदाधिकारी नारायण घोडके, किशोर सावदेकर, सतीश कांबळे, रवींद्र पाटील, राजेश प्रजापती, फरीद बागवान, अनिल भिंगाने, आकाश चौधरी, अक्षय राजन कर, चेतन बोरनारे, भागवान पाटील, जे.बी. काेटेचा आदी मान्यवर उपस्थित होते.

तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन तालुका होमगार्ड पथक आणि अर्जुना बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले. तिरंगा सन्मान संचलन रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून सकाळी ९.३० वाजता भर पावसात निघाली. रॅलीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सर्व सहभागी संस्था, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नाहाटा कॉलेजचे एनसीसी कॅडेट, सेंट अलॉयसियस हायस्कूल, बँड पथक, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, स्वतंत्रता सेनानी वेशभूषा पथक, व्यापारी मंडळ, टॉस स्पोर्ट््स क्लब टीम, बोहरी समाज बांधव, महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चाैधरी व पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले. रॅलीचा समारोप ताप्ती पब्लिक स्कूलच्या मैदानात झाला. यावेळी प्राचार्या लीना कटलर, शिक्षक व विद्यार्थी यांनी रॅलीचे स्वागत केले. माजी सैनिक मेजर मकासरे यांनी तिरंगा ध्वजाचे महत्त्व सांगितले. आमदार सावकारे यांनी, तिरंगा खांद्यावर घेऊन चालण्याचा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असल्याचे मनोगत यावेळी बाेलताना व्यक्त केले.

महिला क्रीडा मंडळातर्फे हाेणार ७५ वृक्षांची लागवड
येथील महिला क्रीडा मंडळातर्फे आरती चाैधरी यांच्या निवासस्थानी ध्वजाराेहण झाले. यावेळी मंडळाच्या महिला पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या. अध्यक्ष चाैधरी यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. पाऊस असतानाही महिलांची उपस्थिती हाेती. यावेळी विविध ठिकाणी ७५ वृक्षांची लागवड करण्याचे नियाेजन मंडळातर्फे करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...