आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शाळा, महाविद्यालयांजवळ वाढला टवाळखोरांचा त्रास

भुसावळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओ आणि टारगटांचा उपद्रव वाढला आहे. पालकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी मध्यंतरी काळात कारवाई केली. आता पुन्हा या समस्येने डोके वर काढले आहे. या टारगटांचा बंदोबस्त होण्यासाठी दामिनी पथकाची गस्त वाढवावी, अशी मागणी आहे.ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थिनी शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गांमध्ये येतात.

मात्र, रोडरोमिओ विद्यार्थिनींचा येण्या-जाण्याचा रस्ता, शाळा-महाविद्यालय परिसरात ठाण मांडून छेड काढतात. या प्रकरणी पालकांसह शिक्षकांनी पोलिस उपअधीक्षकांकडे तक्रारी केल्या होत्या. डीवायएसपींनी ही बाब गांभीर्याने घेत स्वतंत्र पथक नेमून कारवाई सुरु केली होती. त्यामुळे के.नारखेडे विद्यालय, नाहाटा कॉलेज, दादासाहेब भोळे महाविद्यालय, डीएल हिंदी हायस्कूल, कोटेचा कॉलेज आदींच्या परिसरातील टारगटांची संख्या कमी झाली होती. मात्र, सणउत्सव व नंतरच्या गणेशोत्सवात पोलिसांवर इतर कामांचा ताण वाढल्याने दुर्लक्ष झाले. याच काळात टारगटांचा त्रास वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...