आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेदाेली येथे व्ही. पी. पाटील यांचे आवाहन‎:वैज्ञानिक दृष्टिकोन‎ रुजवण्याचा प्रयत्न करा‎

तळेगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाने देव आणि धर्माचा पूर्णपणे‎ आदर करावा. परंतु, देव आणि‎ धर्माच्या नावाखाली होणारा‎ काळाबाजार रोखावा. तसेच‎ समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन‎ रुजवण्याचा प्रयत्न करावा, असे‎ प्रतिपादन व्ही. पी. पाटील यांनी‎ केले.‎ जामनेर तालुक्यातील कोदोली‎ येथील ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र‎ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या‎ जामनेर शाखेतर्फे चमत्कार‎ सादरीकरण कार्यक्रम आयोजित‎ करण्यात आला हाेता, त्या प्रसंगी‎ उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन‎ करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे‎ तथा पंचायत समितीचे माजी सदस्य‎ व्ही. पी. पाटील ते बाेलत हाेते. या‎ कार्यक्रमात जामनेर शाखेचे प्रधान‎ सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, कार्याध्यक्ष‎ भीमराव दाभाडे व शोभा बोऱ्हाडे‎ यांनी चमत्कारांची प्रात्यक्षिके करून‎ दाखवली तसेच त्यामागील विज्ञान‎ समजावून सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...