आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयरोग आजाराबाबत जनजागृती:क्षयराेगावर औषधाेपचारांनी मात शक्य

यावल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका आरोग्य विभागाकडून गणेशाेत्सवानिमित्त क्षयरोग आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. क्षयराेग हा असाध्य राेग नाही, तर याेग्य औषधाेपचार घेतल्यास त्यावर मात करता येणे सहज शक्य असल्याची अशी माहिती देण्यात येत आहे.

मनवेल येथील आशा स्वयं सेविकांमार्फत गणेश मित्र मंडळ मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांच्या वेळी उपस्थित असलेल्या महिलांना आशा सेविका रंजना कोळी, पूनम पाटील यांनी क्षयरोग आजाराबाबत जनजागृतीसाठी मार्गदर्शन केले. क्षयरोग मुक्त अभियानांतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.गफुर तडवी, साकळी येथील डाॅ.स्वाती कवडीवाले, क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.अस्मा प्रवीण, नमुउद्दीन शेख, गट प्रवर्तक चित्रा जावळे, लीना पाटील यांच्या देखरेखीत क्षयरोग आजाराची लक्षणे, त्यावरील उपचार याबाबत माहिती देण्यात आली.

अफवांना बळी पडू नका; आराेग्य विभागाशी संपर्क साधा
क्षयरोग आजार उपचार घेेतल्यास बरा होतो. या आजारावर आरोग्य विभागामार्फत औषधाेपचार करण्यात येत असून शासनाकडून अनुदान दिले जाते. रुग्णांनी काेणत्याही अफवांना बळी न पडता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व क्षयरोग आजाराबद्दल शंका समाधान करून घ्यावे, असे मार्गदर्शन आशा स्वयंसेविका रंजना कोळी यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका कल्पना पाटील, आशा स्वयंसेविका, ज्योती मोरे यांच्यासह गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...