आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावे पंढरीसी आवडे:तुका म्हणे एैसे आर्त ज्यांचे मनी, त्यांची चक्रपाणी वाट पाहे ; कोरोनामुळे सलग दोन वर्षे चुकलेली वारी यंदापासून सुरू

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेगावीचा राणा माहेरी निघाला, संगे संत मेळा भजनी रंगला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला लळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसे आर्त ज्यांचे मनी, त्यांची चक्रपाणी वाटप पाहे. हिच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दासे .. पंढरीचा वारकरीे वारी चुको न दे हरी। गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे चुकलेली वारी यंदापासून सुरु झाली. संत श्री गजानन महाराज संस्थान शेगावची पायीवारी सोमवारी ७०० वारकऱ्यांच्या सहभागात मार्गस्थ झाली. पंढरीच्या विठूमाऊलीच्या चरणी ही पालखी ८ जुलै रोजी विसावेल व १३ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघेल. श्रींच्या मंदिरातून श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते गुरु गजानन माऊली, जय हरी विठ्ठल .. श्री हरी विठ्ठल नामाचा जय घोष टाळ-मृदुंगाच्या निनादात सकाळी सात वाजता श्रींच्या समाधी मंदिराच्या बाजूला सुरु झाला. सुशोभित सिंहासनावर श्री गजाननाचा रजत मुखवटा संस्थानच्या पुजारी वर्गाने आणला. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याची विधिवत पूजा केली. नंतर भक्तिमय वातावरणात असंख्य भक्तांनी दर्शन घेतले. त्यानंतर टाळमृदुंगाच्या अमृतमय गजरात ‘’सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी’’ हा अभंग टाळकरी व वारकऱ्यांनी सादर केल्यानंतर, नाम विठोबाचे घ्यावे पाऊल पुढे पुढे टाकावे, असे म्हणत वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यास सुरुवात केली. जय गजानन श्री गजानन, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामघोषाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर श्री संस्थानचे विश्वस्तांच्या हस्ते वीणा पूजन व श्रींच्या पालखीचे विधिवत पूजन करून विश्वस्तांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी हजारो भक्तांची उपस्थिती होती. श्रींची पालखी नागझरी येथे पोहोचल्यानंतर श्री संत गोमाजी महाराज संस्थानच्या वतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. नंतर श्रींची पालखी पारसकडे मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी पालखीतील वारकऱ्यांना सेवाभावी भक्त मंडळींकडून पाणी व सरबताचे वाटप करण्यात आले.

श्रींच्या पालखीचा प्रवास श्री संत गजानन महाराजांची पालखी ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमी चे अंतर कापून आषाढ शुक्रवार आठ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठलाच्या पावन भूमीत दाखल होणार आहे. १२ जुलै पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर आषाढ शुद्ध पंधरा बुधवार १३ जुलै रोजी श्रींची पालखी शेगाव कडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. सुमारे ७५० कि. मी. चा पायी प्रवास केल्यानंतर तीन ऑगस्ट रोजी श्रींची पालखी खामगाव मार्गे शेगावला परत येईल. असा येण्या-जाण्याचा तेराशे कि. मी. चा पायी प्रवास श्रींच्या पालखी तील वारकरी भक्तिभावाने गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप करत आनंदात करणार आहेत. पालखीचा आजचा मुक्काम पारस येथे राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...