आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह उत्सव:यावलमधील गंगेश्वर महादेव मंदिरात तुळशी विवाह उत्सव

यावल5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विस्तारित भागातील गंगेश्वर महादेव मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळशी विवाह पार पडला. या कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीने तुळसी विवाह सोहळा रंगला. गंगेश्वर महादेव मंदिरात सोमवारी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुलसी विवाह आयोजित केला होता.

दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मंदिरात पुजारी अनिल गावडे यांच्या मार्गदर्शनात हा उत्सव पार पडतो. यंदा गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांच्या सहभागाने संपूर्ण धार्मिक विधी पार पाडले. या उत्सवानिमित्त मंदिर परिसराला रांगोळ्या काढून व रोषणाई करून सजावट केली होती.

बातम्या आणखी आहेत...