आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल आज:आज बारावीचा निकाल, उत्सुकता शिगेला; ग्रामीण भागात 977 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर होईल. यंदा भुसावळ शहरातील ९ केंद्रावर ३,२५२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यानंतर ८ जूनला ऑनलाइन निकाल असल्याने विद्यार्थी, पालकांची उत्सुकता वाढली आहे.

परीक्षा झाल्यानंतर शिक्षण मंडळाच्या कार्यालयांमार्फत लगेच निकालाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्याने बुधवारी बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होत आहे. दरम्यान, भुसावळ शहरातील ३,२५२ तर ग्रामीण भागात ९७७ विद्यार्थ्यांनी मार्च महिन्यात बारावीची परीक्षा दिली होती. त्यांचा निकाल ऑनलाइन लागणार असला तरी गुणपत्रक शाळांमधूनच काही काळाने मिळेल. गेल्या वर्षी कोरोनामुळे मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर झाले होते. त्यात १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

बातम्या आणखी आहेत...