आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बंद घरातून अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या श्री नगरातील रहिवासी ढोलपुरे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने मिळून २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शनिवारी (दि.३) शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

श्री नगरातील विठ्ठल मंदिराजवळील रहिवासी हेमा अर्जुन ढोलपुरे (वय २७) हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी बंद घरातील कपाटातून १ लाख ५६ हजार ६८० रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच १ लाखांची रोकड मिळून २ लाख ५६ हजारांचा ऐवज लांबवला. ढोलपुरे हे गावावरून परत आल्यानंतर चोरी उघड झाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...