आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:बंद घरातून अडीच लाखांचा ऐवज लंपास ; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या श्री नगरातील रहिवासी ढोलपुरे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने मिळून २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी शनिवारी (दि.३) शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.हेमा अर्जुन ढोलपुरे (वय २७) हे बाहेरगावी गेल्याने घर बंद होते. ही संधी चोरट्यांनी साधली. २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान बंद घरातील कपाटातून १ लाख ५६ हजार ६८० रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच १ लाखांची रोकड मिळून २ लाख ५६ हजारांचा ऐवज लांबवला. ढोलपुरे घरी परतल्यावर चोरी उघड झाली.

बातम्या आणखी आहेत...