आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्यानंतर, आता डेंग्यूने डोके वर काढले आहेत. जामनेर रोडवरील रानातला महादेव, हुडको कॉलनी परिसरातील दोघा भावांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पालिकेने शहरात धुरळणी व फवारणी न केल्यास ही रुग्ण संख्या वाढीची भीती आहे.
शहरात ११ जुलैपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागांत पावसाचे पाणी साचून एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होत आहे.
अशा उपाययोजना करा
घराच्या परिसरात पावसाचे पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यावर अॅबेट, वापरलेले ऑईल टाका किंवा गप्पी मासे सोडा.घरातील फुलझाडांच्या कुंड्या, कुलरचे टब, नाराळाच्या करवंट्या, जुने टायर आदींमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही, ही दक्षता घ्या. घरातील पाण्याच्या टाक्यांवर झाकण बसवा, दर आठ दिवसांनी पाण्याची भांडी स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळावा.डासांपासून बचावासाठी खिडक्यांना जाळ्या बसवा. झोपताना मच्छरदाणी वापरा.
सायंकाळी डेंग्यूचा डास चावण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे अंग झाकले जाईल असे कपडे वापरा.
घराच्या परिसरात पावसाचे पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यावर अॅबेट, वापरलेले ऑईल टाका किंवा गप्पी मासे सोडा.घरातील फुलझाडांच्या कुंड्या, कुलरचे टब, नाराळाच्या करवंट्या, जुने टायर आदींमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही, ही दक्षता घ्या. घरातील पाण्याच्या टाक्यांवर झाकण बसवा, दर आठ दिवसांनी पाण्याची भांडी स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळावा.डासांपासून बचावासाठी खिडक्यांना जाळ्या बसवा. झोपताना मच्छरदाणी वापरा. सायंकाळी डेंग्यूचा डास चावण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे अंग झाकले जाईल असे कपडे वापरा.
तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य
हुडको भागात धूरळणी व फवारणी करावी, यासाठी नागरिकांनी वारंवार पालिकेकडे मागणी केली आहे. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करते. गोरगरीब रुग्णांना खासगीत महागडे उपचार घेणे परडवणारे नाही. त्यामुळे पालिकेने आपली जबाबदारी ओळखून धूरळणी व फवारणी करावी. मंगेश पाटील, हुडको कॉलनी
...तर डेंग्यू ठरू शकतो जीवघेणा, दक्ष राहा
सध्या डेंग्युच्या रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये हे प्रमाण वाढेल. डेंग्यू शॉक सिंड्रोम व डेंग्यू हॅमरेज फिव्हर या प्रकारात रुग्णाचा जीवदेखील जावू शकतो. प्राथमिकपेक्षा दुसऱ्या प्रकारात मृत्यूचा धोका अधिक असतो. यामुळे बचाव करणेच उत्तम उपाययोजना आहे.
डॉ. पंकज राणे, बालरोग तज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.