आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:मुक्ताईनगर, बोदवडमध्ये मराठा समाजासाठी दोन सांस्कृतिक सभागृहे, प्रत्येकी 70 लाख रूपये खर्च

मुक्ताईनगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाने केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर व बोदवड शहरात प्रत्येकी ७० लाख रूपये खर्चाच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहाला मंजुरी दिली आहे. याशिवाय मतदार संघात एकूण १० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहे, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कळवले.

मुक्ताईनगर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे, भवानी माता मंदिराजवळ सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसवणे, खुली जागा विकसित करणे, आस्था नगरी ते संत मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, बालाजी टॉकीज ते हनुमान मंदिरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम, भवानी मंदिरामागील जुन्या कब्रस्तान मागे रस्ता काँक्रिटीकरण, अकबर शहा ते जनार्दन बोंदडे व कडू चांभार यांचे घर ते उर्दू शाळेपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, अयुब पिंजारी ते मुजाहिद ड्रायव्हर यांचे घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम, मुक्ताई झेरॉक्स आस्था नगरीच्या नाल्यापर्यंत गटार बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. बोदवड नगरपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम, भिल्ल वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक व आरसीसी गटार बांधकाम, ग्रामीण रुग्णालयापासून ते किशोर तायडे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आरसीसी गटार व रस्ता काँक्रिटीकरण, महाकाल चौक ते सूरज सारवान यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, जामठी रोडवरील स्मशानभूमी जवळील मेंबर कॉलनी, युसूफ ठेकेदार यांच्या घरापासून ते जीवन माळी यांच्या घर व इतर ठिकाणी वेगवेगळी कामे होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...