आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडगुजर समाजाचे आज महाअधिवेशन‎:लाेहारीत दाेन दिवस कार्यक्रम; मुख्यमंत्र्यासह राज्यभरातून समाजबांधव येणार‎

पाचाेरा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाेहारी (ता. पाचाेरा) येथील‎ बडगुजर समाज चामुंडा माता ‎मिशनतर्फे अखिल भारतीय‎ बडगुजर समाजाचे महाअधिवेशन‎ ७ व ८ जानेवारी राेजी चामुंडामाता ‎मंदिर, लाेहारी येथे आयाेजित केले ‎आहे. या अधिवेशनास मुख्यमंत्री ‎एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात व इतर राज्यातून‎ समाजबांधव सहभागी हाेणार आहे.‎ राज्यस्तरीय अधिवेशनात‎ पहिल्या दिवशी ७ राेजी सकाळी ८‎ ते ९ वाजता ग्रंथ पूजन, नगर‎ प्रदक्षिणा साेहळा महामंडलेश्वर‎ याेगीराज महाराज (शेलगावकर)‎ व गजानन मंगल जाेशी यांच्या हस्ते‎ हाेईल. अध्यक्षस्थानी महासमितीचे‎ माजी अध्यक्ष उमेश कराेडपती हे‎ असतील. उद‌्घाटन अ. भा.‎ बडगुजर समाज महासमितीचे‎ अध्यक्ष आनंदा सूर्यवंशी,‎ दीपप्रज्वलन मुंबईच्या उत्कर्ष‎ मंडळाचे अध्यक्ष बापू बडगुजर,‎ प्रतिमा पूजन उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे शिवसेनेचे नाशिक‎ शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या‎ हस्ते हाेईल.

त्यानंतर सकाळी ९ ते‎ १२ व दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान‎ समाजातील शेतकरी दुर्लक्षित‎ विवाह समस्या, महिला संघटन व‎ सक्षमीकरण काळाची गरज,‎ समाजातील घटस्फाेटातील विदारक‎ समस्या, सुशिक्षित बेराेजगार‎ युवक-युवतींना उद्याेग‎ व्यवसायाकडे वळणे काळाची‎ गरज, शैक्षणिक प्रगतीपण याेग्य‎ मार्गदर्शन काळाची गरज, आेबीसी‎ केंद्रीय आरक्षण विकासाची‎ गुरुकिल्ली या सामाजिक विषयावर‎ चर्चा, रात्री ९ वाजता सामाजिक‎ प्रबाेधनावर व्याख्यान हाेणार आहे.‎

दाेन मंत्री, चार खासदार, १२ आमदारांची रविवारी उपस्थिती‎ रविवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थित‎ कार्यक्रम हाेणार आहे. कार्यक्रमाचे‎ उद‌्घाटन खासदार सी. आर. पाटील‎ (सुरत), संभामंडप भूमीपूजन‎ आमदार किशाेर पाटील, स्मरणिका‎ प्रकाशन ग्रामविकास, वैद्यकीय‎ शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश‎ महाजन, गाेशाळा उद‌्घाटन‎ पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील‎ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.‎ या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून‎ खासदार ज्ञानेश्वर पाटील, उन्मेष‎ पाटील, रक्षा खडसे, आमदार‎ जयकुमार रावल, चंदूभाई पटेल,‎ चिमणराव पाटील, संजय शिरसाठ,‎ सुरेश भाेळे, संजय सावकारे, लता‎ साेनवणे, चंद्रकांत पाटील, मंगेश‎ चव्हाण, संगीता पाटील, चंद्रकांत‎ रघुवंशी उपस्थित राहणार आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...