आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:दोन मित्रांनी केला डोक्यात दगड घालून रोहितचा खून; खडक्याच्या सागरला डोंबिवलीमध्ये पकडले

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रामदेवबाबा नगरातील रहिवासी रोहित दिलीप कोपरेकर (वय २२) याचा दोन मित्रांनीच खून केल्याचे समोर आले आहे. यानंतर पसार झालेल्या दोघांपैकी सागर दगडू पाटील(वय २२, रा.खडका ता.भुसावळ) याला कल्याण क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी डोंबिवली येथून ताब्यात घेतले.

गेल्या रविवारी वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रस्त्यावरील डाॅ. आंबेडकर वसतिगृहामागील शेतात रोहितचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या खुनाच्या गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांचा रोहितच्या दोन मित्रांवर संशय बळावला. मात्र, ते पसार झालेे. त्यापैकी एक सागर दगडू पाटील (वय २२, रा. खडका, ता.भुसावळ) हा डोंबवली येथे उमेश नगर नाका परिसरात मित्राच्या घरी गेला होता. दरम्यान, भुसावळातील खुनाच्या गुन्ह्यातील एक आरोपी आपल्या भागात आल्याचे कल्याण क्राइम ब्रँचचे पोलिस कर्मचारी गुरुनाथ जरग यांना समजले. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांना दिली. नंतर निरीक्षक आनंद रावराणे, उपनिरीक्षक मोहन कळमकरयांच्या पथकाने सोमवारी सकाळी उमेश नगर नाका येथे सापळा लावून सागर पाटील यास अटक केली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिसांत माहिती दिली. पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी हवालदार विजय नेरकर यांच्या पथकास कल्याणला पाठवले. त्यांनी तेथून सागरला ताब्यात घेतले.

हत्येची कबुली, दुसऱ्या संशयिताचा कसून शोध
एका मित्राच्या मदतीने डोक्यात दगड घालून रोहित कोपरेकर याला ठार केल्याची कबुली सागरने पोलिसांकडे दिली. त्यामुळे पोलिस दुसऱ्या संशयिताचा शोध घेत आहे. त्यासही लवकरच जेरबंद करू, असे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक राहुल गायकवाड म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...